HW News Marathi
देश / विदेश

काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस मग तिकडेच!

मुंबई | विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं विषेश आकर्षण असतं. यंदा शन्मुखानंद सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करत होते.

शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडतो आहे. याआधी दुपारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगावात भगवान गडावरील दसरा मेळावा खूप गाजला. त्याआधी नागपुरात सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन पार पडलं. त्यानंतर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जनतेचं लक्ष आहे.मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि बघिनी आणि मातांनो अशी हाक देता आली.

काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच

मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत अशताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हावला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादी सय्यद सलाउद्दीनचा मुलगा एनआयएच्या ताब्यात

swarit

इंडोनेशियात ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

News Desk

बॅटने पालिका अधिकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आकाश विजयवर्गीयला अटक

News Desk