HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! महाराष्ट्रात नवा कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण नाही – राजेश टोपे

मुंबई | राज्यात हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताना दिसत आहे. दरम्यान, याच बाबतीत राज्यातून आनंदाची बातमी येत आहे. राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही. सरकार सर्व खबरदारी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. तसेच राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे

देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्रात कोणीही इन्फिल्टेड झालेलं आढळलेलं नाही. पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येक प्रवशांचा स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. आतापर्यंत ४३ जणांचे सँपल घेण्यात आले आहेत, असं सांगतानाच नव्या कोरोनाच्या संसर्गावरून महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहे. सरकार अत्यंत गंभीरपणे या प्रकरणात लक्ष घालत आहे. कोणताही निष्काळजीपणा केला जात नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

ब्रिटनमधून आलेले काही प्रवासी सापडत नाहीत. हा गंभीर विषय आहे. पोलिसांना या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रवाशांचा शोध सुरू आहे. या प्रवाशांनीही स्वत:हून आरोग्य यंत्रणेसमोर येऊन तपासणी करून घ्यावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक मास्क लावत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. मात्र, नागरिकांनी गाफिल राहू नये. गर्दी करू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असंही ते म्हणाले आहेत.

नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत लोकल सेवा सुरू होणार का? असा सवाल टोपे यांना विचारण्यात आला. त्यावर लोकल सेवा पुढच्या वर्षी सुरू करायच्या की नाही, याचा आढावा घेतला जाईल. नवीन वर्षात रुग्णांची संख्या काय राहते हे पाहू, त्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे लोकल बाबतीत लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा सध्या नागरिकांकडून केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ ऑगस्टला लॉकडाउनच्या विरोधात ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन !

News Desk

अमेरिकेतील भारतीयांना धक्का ! डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘H1- B’ संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

News Desk

#Coronavirus : कोटातून ७४ विद्यार्थी पुण्यात दाखल

News Desk