HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाच्या ‘त्या’ तुम्ही तिला कधी फोन करणार? कॉंग्रेसचा NCBला प्रश्न  

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध महाविकास आघाडी हा वाद अजुन तरी शमन्याची चिन्ह दिसत नाही आहे. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा ड्रग्सबाबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. कंगना मुंबईत परत आली आहे. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

‘कंगनाच्या व्हिडीओबद्दल तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय (Y) दर्जाची सुरक्षा दिली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवत आहे आणि तो मोठा गुन्हा आहे.’ असं देखील सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनानं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होतं. एवढंच नाही तर कंगना हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल केले होते. तेव्हापासून कंगना ही महाविकास आघाडी सरकारसह नेत्याच्या रडारवर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांचा शिवसेनेला टोला ‘करून दाखवले’

News Desk

राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असाल तर राजीनामा द्या-सुप्रिया सुळे

News Desk

ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर, स्वगृही परतण्याचा मार्ग खुला !

News Desk