HW News Marathi
व्हिडीओ

‘ईडी’ने का पाठवली वर्षा संजय राऊत यांना नोटीस ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आणि त्यानंतर महाविकासआघाडीसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. खरंतर आज (२९ डिसेंबर) वर्षा राऊत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून घेतली आहे. यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला आहे. दरम्यान, या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता प्रश्न असा उपस्थित होतोय कि वर्षा राऊत यांना नेमकी कोणत्या प्रकरणी ईडीने हि पाठवली ? तर याबाबत राजकीय वर्तुळात नेमक्या काय चर्चा सुरुयेत ते आज आपण जाणून घेऊया

#SanjayRaut #VarshaSanjayRaut #ED #Shivsena #UddhavThackeray #HDIL #PMC #PMCScam #AnilParab

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”, Dhananjay Munde यांची मागणी

News Desk

बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा?; Pankajaयांचं गृहमंत्र्यांना पत्र, Dhananjay Munde दखल घेणार?

News Desk

Farmer Protest | शेतकऱ्यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

News Desk