HW News Marathi
महाराष्ट्र

विघ्नहर्त्याची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांवरच विघ्न

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. मुंबईतील अनेक मोठ्या गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामुळे अनेक गणेश मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेने यासंदर्भात मुंबईतील एका मूर्तीकाराशी संवाद साधला. यावेळी या मुर्तीकाराने म्हटले की, गणेश चित्रशाळांमध्ये काम करणारे कामगार आपल्या गावी जाऊन बसले आहेत. मुंबईत पुन्हा यायला ते घाबरत आहेत. आम्ही दरवर्षी जवळपास १२०० गणेशमूर्ती घडवतो. मात्र, यंदा आम्हाला फक्त ७०० गणेशमूर्तीच घडवता येतील.

राज्य सरकारने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करा, असे सांगितले आहे. मात्र, मूर्ती तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणे मंडप उभारण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. आपल्या घरीच गणेशमूर्ती तयार करा, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, आमची घरे तेवढी मोठी नाहीत. याशिवाय, वाहतुकीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या मालाचाही तुटवडा जाणवत असल्याची प्रतिक्रिया गणेश मूर्तीकार सागर यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गारपीठीने शेतकरी आडवा झालाय…”; पंचनामे न करण्यावरून अजित पवार आक्रमक

Chetan Kirdat

“भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?” देशमुख प्रकरणावरून राऊतांचा सवाल!

News Desk

राज्यातील ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा – बाळासाहेब थोरात

News Desk