HW News Marathi
महाराष्ट्र

जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक हुशार आहेत – गिरीश बापट

पुणे | अटल संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. गिरीश बापट यांनी यावेळी भाषण करताना जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले.

खासदार गिरीश बापट भाषण करताना म्हणाले की “जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार आहेत की, त्या व्यक्तीचा आणि पुण्याचं कनेक्शन कसे हे लगेच जोडतात. अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. जो बायडेन राष्ट्रपती झाले. तर लगेच एका पुण्याच्या व्यक्तीने जोडले राष्ट्रपती जो बायडेन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे होते. अहो इंदिरा गांधी पुण्याच्या हुजुरपागा शाळेत शिकल्या आणि बरं का देवेंद्र तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कारण तुमचे काका पुण्यात होते. म्हणजे पुणेकर हुशार आहेत, सगळं करून पुन्हा पुण्याशी नातं येतं,” असं म्हणताच सभागृहात एकच पिकला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व,कर्तृत्व, त्याग, बलिदानाचे योगदान सर्वाधिक – अजित पवार

News Desk

पाटलांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो, पण फटका लगावतो !

News Desk

संजय राऊत आणि शाहू महाराज यांची भेटी; मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून केली चर्चा

Aprna