HW News Marathi
महाराष्ट्र

वडेट्टीवार यांच्या विरोधात लढलेले शिवसेना उमेदवार काँग्रेसमध्ये दाखल

चंद्रपूर | काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली असे शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे. विशेष म्हणजे स्वतः विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

संदीप गड्डमवार हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक आहेत. ब्रम्हपुरी मतदारसंघातून 2009 मध्येही संदीप गड्डमवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र अवघ्या साडेपाच हजारांच्या मताधिक्याने भाजप उमेदवार अतुल देशकर यांनी निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये संदीप गड्डमवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

मात्र वडेट्टीवारांनी बाजी मारली आणि भाजप उमेदवारानंतर गड्डमवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर गड्डमवार यांनी २०१८ ची विधानसभा निवडणूक पुन्हा मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात लढवली. पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. परंतु पुन्हा त्यांना पराभवाचा धक्का बसला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात ८ दिवस संचारबंदी!

News Desk

आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते…”, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना राणेंनी दिला उजाळा!

News Desk

जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचे वर्चस्व, राज्यासह जिल्ह्यात भाजपची पीछेहाट

News Desk