HW News Marathi
महाराष्ट्र

अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ की, पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही | हसन मुश्रीफ

मुंबई | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे वादग्रस्त विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. हसन मुश्रीफ म्हणाले, ठेवणीतीली शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोप येणार नाही, यांना रात्री जागून काढाव्या लागतील, असा इशारा त्यांनी पडळकरांना दिला.

हसन मुश्रीफ म्हटले, “बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्ये केली त्याचा मी निषेध नोंदविला. शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील. अशा प्रकारची पद्धत या राज्यात सुरु झाली आहे. कायदा सुव्यवस्था देखील यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असतील,” असा आरोप त्यांनी केला.

गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले

‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

News Desk

सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी 7 ते 9 ऑगस्टला राज्यव्यापी संप

News Desk

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!

News Desk