HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस जो संभ्रम होता की खडसे खरचं भाजप सोडणार का तो संभ्रम अखेर दुर झाला आहे. २३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकनाथ खडसे प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचे महाविकास आघाडी सरकार कडून स्वागत केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांचे स्वागत केले आहे.

या आधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबरला ते प्रवेश करणार असे म्हटले जात होते. मात्र, एकनाथ खडसेंनी त्यावेळेस या वृत्ताला नकार दिला होता. आणि प्रवेशाबद्दल काही बोलणेही टाळले होते. भाजपवर नाराज असलेल्या खडसेंनी हा निर्णय घेतल्यानंतर भाजपची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा म्हणजे ‘नो-कॉस्ट’ नव्हे, तर ‘नो-मेट्रो’  

News Desk

ऑस्ट्रेलियाच्या खासदाराची अजब मागणी, चक्क योगींनां मागितलं उधारीत!

News Desk

‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधींना सोनिया गांधी, राहुल गांंधीसह पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

News Desk