HW News Marathi
Covid-19

खासदार सुप्रिया सुळेंकडून रायगड जिल्ह्यातील शाळांना पत्रे आणि इतर साहित्याचे वाटप !

रायगड | निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शाळांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भेट दिली आणि आपदग्रस्त शाळांच्या व्यवस्थापनाकडे पत्रे व इतर पूरक साहित्य सुपूर्द केले.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने आपदग्रस्त शाळांना पत्रे व इतर पूरक साहित्य वाटप करण्यासाठी आज वेल्फेअर ट्रस्टच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे या मुरुड – नांदगाव येथे आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला होता. शिवाय ज्या शेतकऱ्यांचे व शाळांचे नुकसान झाले त्यांना तातडीने मदत देण्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार आज खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर या शाळेला पत्रे व इतर पूरक साहित्य राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आले. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील आपदग्रस्त ७५ शाळांना लोखंडी पत्रे, ढापे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात त्यांच्यासमवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याच्या विधी व न्याय राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक! बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल कडक लॉकडाऊन!

News Desk

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच !

News Desk

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण  

News Desk