HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, घोडेबाजारांचे राजकारण करणार नाही !

मुंबई | महाराष्ट्रच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला उद्या (२७ नोव्हेंबर) विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले. फडणवसी यांनी आज (२६ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. फडणवीस यांनी अवघ्या ७९ तासात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

जे लोके मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले. महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता, असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर तोफ डागली. आमच्या पक्षाने भूमिका घेतली होती की, घोडेबाजार आणि फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अख्खे घोड्याचा तबेला उभा केला असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असे कधीही ठरले नव्हते. न ठरलेल्या बाबींचा बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. महाविकासआघाडीचे तीन चाके असलेले सरकार चालणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

जनतेने महायुतीला बहुमत दिले होते – फडणवीस

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याच्या जनतेने महायतुली संपूर्ण बहुतम दिले तर भाजपने १०५ जागी विजयी मिळाला आहे. मात्र, शिवसेनेने पहिल्या दिवसापासून बार्गेनिंगला सुरूवात केली आहे. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी अनेक दिवस शिवसेनेची वाट पाहिली. परंतु शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा करत होती, असा आरोप फडणवीस यांनी शिवसेनेवर केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

News Desk

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री 

News Desk

ऐन निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजनांना कोरोनाची लागण

News Desk