HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे खळखट्याक राजकारण

आरती मोरे | महाराष्ट्राचे खळखट्याक राजकारण अनपेक्षित, अनाकलनीय असे अनेक शब्द महाराष्ट्राच्या राजकारण्यांबाबत वापरले जातात आणि त्यामध्ये असणारी सत्यता आज (२३ नोव्हेंबर) प्रकर्षांने पुन्हा दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्राला सरकार मिळाले. हे सरकार स्थिर असेल असा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे परंतु फोडाफोडीचे सरकार करणार नाही, असे दावा पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, दावे -प्रतिदावे, राजकारण-समाजकारण अशा नाट्यमय घडामोडींचा हा खेळ अजूनही संपलेला नाही. ३० नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खरी कसोटी असेल ती कारण तेव्हा त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे.

निवडणुकीआधी असणारी समिकरणे पुर्णत: बदललीयेत. सध्या शिवसेना -राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस हे एकत्रतिपणे आहेत तर भाजप आणि अजित पवार एकत्र आहेत. अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीदाची शपथ घेतली. पण या शपथविधीनंतर खरी कोंडी झाली ती महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि बारामतीकरांची, विशेषत: पवार कुटुंबीयांची. कोणालाही कसलीही कुणकुण न लागता. अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा उरकण्यात आला. यानंतर महाराष्ट्रच्या राजकारणात बातम्या झळकल्या आणि लगेचचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंब आणि राजकारणात फुट असे स्टेटसे टाकले तर शरद पवारांनी सोशल मिडीयावरून आपण अजित पवारांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ नसल्याचे स्पष्ट केले. काहीचे वेळात पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर अजित पवारांसोबतचा फोटो बदलून शरद पवारांसोबतचा फोटो ठेवला. पटापट घडामोडी घडत गेल्या आणि अनेक अर्थ निघत गेले.

अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे यामागे अनेक कारण असू शकतात, याला काही घटनांची किनार आहे. अजित पवार यांच्यावर असलेल्या शिखर बॅंक घोटाळ्याच्या कारवाईच्या भितीपोटी हे घडले का असाही प्रश्न उपस्थित राहतोय. शरद पवार यांच्यावर ईडीची कारवाई होणार असल्याची घटना महत्त्वाची आहे कारण त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला आणि त्यावेळीचे पवार कुटुंबात वाद सुरू असल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना पक्षाच्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत, मी बारामतीला चाललोय असे त्यांनी सांगितले. काॅंग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत असताना अजित पवार समाधानी नाहीत असा सुर उमटत होता. राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेला बोलावले. तेव्हा अजित पवारांनी मुदत वाढवून मागितली आणि लगेचे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आजचा शपथविधी अनेक प्रश्न उपस्थित करणारा आणि अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा देणारा ठरला.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार अजित पवारांसोबत राहतील का हा प्रश्न महत्वाचा आहे कारण त्यातले अजितदादांच्या विश्वासातले आमदार शरद पवारांकडे पुन्हा आलेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रेस नंतर शरद शरद पवांरांनी शिवसेनेला आणि काॅंग्रेसली धोका दिला आहे. ही शंका तात्पुरती दुर झालीये. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष आहेच. महाशिवआघाडीचे सरकार स्थापन व्हायला काॅंग्रेसमुळे उशीर झाला अशी कानकुण सध्या सुरू आहे. मात्र आज सकाळी झालेल्या राजकीय घडामोडीमुळे फक्त सर्वसामान्यांची नाही तर राजकारण्यांची झोपही उडालीचे परंतु या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये शेतकर्यांसाठी आणि जनतेलाठी राज्यात सरकार स्थापन झालयं ही गोष्ट सुखावह आहे की धक्कादायक आहे याचा उलगडा ३० तारखेला होईलचे …

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा, उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना साद

News Desk

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

News Desk

विहंग सरनाईक ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk