HW News Marathi
महाराष्ट्र

गोपिनाथ मुंडे,एक नावाजलेला ‘लोकनेता’!

भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांची आज जयंती(१२ डिसेंबर) . मुंडे जरी आपल्यात नसले तरी त्यांची राजकीय कारकीर्द कायम आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे. बीडमध्ये शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी राजकारणाचं मैदान देखील त्याचं तडफेनं मारलं. महाराष्ट्रात भाजपच्या वाढीमध्ये गोपीनाथ मुंडेंचा सिंहाचा वाटा होता. स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या मदतीनं गोपीनाथ मुंडेंनी राज्यात भाजप वाढवली, रूजवली ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. शिवसेना – भाजप युती घट्ट, दृढ करण्यामागे गोपीनाथ मुडेंची मोठी भूमिका होती. युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ‘गुन्हेगारांचा कर्दनकाळ’ अशी ख्याती त्यांनी मिळवली होती. बीड सारख्या मागास जिल्ह्याला राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू करण्यामागे गोपीनाथ मुंडेचा मोठा हात. बीडमध्ये गेल्यानंतर त्याची प्रचिती येते. अपघाती निधनानंतर देखील बीडमध्ये गेल्यानंतर बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे बीड हे समीकरण आजही कायम आहे.

“गोपीनाथ मुंडेंची राजकीय कारकिर्द”

गोपिनाथ मुंडे एक यशस्वी राजकारणी तर होतेच शिवाय एक शेतकरी देखील होते. २०१४ मध्ये मे महिन्यात नरेंद्र मोदीं च्या मंत्रीमंडळात त्यांचा समावेश झाला परंतु हा आनंद त्यांच्या जीवनाच्या औटघटकेला ठरला कारण त्यानंतर अवघ्या काही दिवसांमधेच दिल्लीत एका कार दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनतेचा पाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जातात. त्यांना भाजपमधील भूमिगत स्तराला काम करणारा नेता असे म्हटले जाते. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख होतीे.

प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुंडे – महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. जनसंघ ते भाजप अशी प्रमोद महाजन यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुंडे यांची वाटचाल झाली. बीड मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथजींनी भाजपसाठी प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख बनली होती. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले होते.

विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुण्डे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिम्ब मतपेटीत उमटले होते. कॉंग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर कॉंग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च १९९५ रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते १९९९ या कालखण्डांदरम्यान ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक होता. त्यांनी महाराष्ट्रात ऊर्जा व गृह यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली होती.

‘गौरव लोकनेता’ म्हणून गोपीनाथ मुंडेंची ओळख”

मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होतीे. गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता.

“गोपिनाथ मुंडेंची कामगिरी”

ऊसतोड कामगारांचे नेते म्हणुन देखील गोपिनाथ मुंडेंकडे पाहिले जाते. त्यांच्या स्वतःजवळ साखर कारखाने असुन देखील ज्या ज्या वेळी ऊसतोड कामगार आणि साखर कारखान्यांच्या मालकांमध्ये संघर्ष उभा राहीला आहे त्या वेळी मुंडे कामगारांच्या पाठिमागे भक्कमपणे उभे राहीले आहेत. युतीच्या कार्यकाळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला, मुंबईत उड्डाणपुलांचे जाळे निर्माण झाले त्यावेळी मुंडे उपमुख्यमंत्री होते. युतीसरकारचे हे मोठे यश मानले गेले.मुंडेंनी तोटयात गेलेले साखर कारखाने, विज निर्मिती प्रकल्प आपल्या हाती घेतले आणि यशस्वी करत आपल्या नेर्तृत्वगुणांना सिध्द केले. मराठवाडा रेल्वेने सर्वदुर जोडला जावा, अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग सुरू व्हावा या करीता मुंडेंनी फार प्रयत्न केले. त्यामुळे २०११-१२ साली भुसंपादन प्रक्रियेला वेग आला.

या कामाची मागणी गोपिनाथ मुंडेंनी लोकसभेत लावुन धरली होती. खाजगी क्षेत्रात ओबिसींना आरक्षण मिळावे याकरीता मुंडे फार आक्रमक होते. गोपिनाथ मुंडेंच्या मागे केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे तर या पक्षाच्या पलिकडे जाऊन अनेक संघटना, अनेक गट, माणसं त्यांच्याशी घट्ट जोडल्या गेली होती. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ग्रामिण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली असल्याने तळागळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते जे आज त्यांच्या मृत्युपश्चात देखील या माणसांनी जपले आहे.यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची पिढी उभी राहत असताना महाराष्ट्राला प्रमोद महाजनांचा धक्का बसला. महाजनांची पोकळी भरू पाहणाऱ्या विलासरावांना नियतीने नेले. पाठोपाठ मराठी माणसांचा आधारवड बाळासाहेबदेखील कोसळले. आता आशा होती गोपिनाथ मुंडेची. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गोपिनाथ मुंडेंटे योगदान महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

News Desk

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सत्यजित तांबेनी केला निषेध

News Desk

‘वर्षा’वर आज तासभर खलबतं ! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

News Desk