मुंबई | काँग्रेसच्या हायकमांडकडून राज्यातील महाशिवआघाडीला सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर आज (२१ नोव्हेंबर) पुन्हा दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रावादीच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली. या संयुक्त बैठकीनंतर नुकतीच राष्ट्रावादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हण यांनी माध्यमांशी संवाद साधला. “काँग्रेस-राष्ट्रावादीत सर्व मुद्द्यांवर आज चर्चा पूर्ण झाली असून या दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. उद्या मुंबईत आघाडीच्या मित्रपक्षांसोबत चर्चा झाल्यानंतर शिवसेनेशी चर्चा करण्यात येईल”, अशी माहिती यावेळी आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.
Prithviraj Chavan, Congress: Congress & NCP have completed discussions on all issues. There is complete unanimity. Tomorrow in Mumbai, we will have meeting with our other alliance parties. Later in the day, we will have discussion with Shiv Sena. #Maharashtra pic.twitter.com/Fkpx3PshL0
— ANI (@ANI) November 21, 2019
काँग्रेस-राष्ट्रावादीची संयुक्त पत्रकार परिषद
- सर्व मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रावादीची चर्चा आज पूर्ण झाली आहे.
- काँग्रेस-राष्ट्रावादीत सर्व मुद्द्यांवर एकमत
- उद्या मुंबईत आघाडीच्या मित्रपक्षांशी चर्चा होईल
- आघाडीचे सर्व नेते मुंबईला रवाना
- मित्रपक्षांशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेशी चर्चा होईल.
- फॉर्म्युल्याबाबतची माहिती लवकरच देऊ.
- उद्या महाविकासआघाडीबाबतची स्पष्टता
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.