HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री आज ३ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे ते जाणार आहेत . तिथे पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा ४ विद्युतगृहांची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर मुख्यमंत्री कोयना धरण परिसराची पाहणी करुन ते ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) कडे प्रयाण करतील. दुपारी २ वाजता ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन होऊन ते गाडीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. 2 च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण करणार आहेत. 2.20 वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी करतील नंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण त्यांच्यासमोर होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग २ सप्टेंबरपासून सुरु ! 

News Desk

भाजपचा पुण्यात फिरकू न देण्याचा इशारा, संजय राऊत थेट वडगाव शेरीत मेळावा घेणार!

News Desk

भावना गवळींकडून जीवाला धोका, शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप!

News Desk