HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचा पुण्यात फिरकू न देण्याचा इशारा, संजय राऊत थेट वडगाव शेरीत मेळावा घेणार!

पुणे। संजय राऊत आज पुण्यात जाणार आहेत. वडगाव शेरीत मेळावा घेत संजय राऊत उद्या भाजपला आव्हान देणार आहेत. कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. संजय राऊतांच्या पुणे दौऱ्यावर भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.संजय राऊतांनी कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी जगदीश मुळीक यांनी केली होती. माजी आमदार जगदीश मुळीक यांचा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आहे.संजय राऊतांना पुण्यात फिरु न देण्याचं आव्हान मुळीक यांनी दिलं होतं. संजय राऊत आज वडगाव शेरीत सेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. भाजप आज नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जगदीश मुळीक काय म्हणाले होते?

वादग्रस्त विधानाबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होते तर मग कोथळा बाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांना वेगळा न्याय का? असा सवाल भाजपने विचारला होता. जोपर्यंत राऊतांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुण्यात फिरकू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता. त्यांनी राऊतांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवत राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती.

शिवसेना स्टाईलने भाजपला उत्तर

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी जगदीश मुळीक यांच्या विरोधात दंड थोपटले होते. संजय राऊत पुण्यात येणार, अडवूनच दाखवा असं आव्हान शिवसेनेनं भाजप नेत्यांना दिलं होतं. संजय राऊतांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने भाजपला उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीनं देण्यात आला आहे.

सव्वा रुपयाच्या दाव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा चिमटा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राजकारणात एकमेकांवर बोलावं लागतं. आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. मीही चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, असंही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणावर भर द्या ! नाना पटोले

News Desk

आता भाजपमध्ये आणखी अनेक नेत्यांचा प्रवेश होणार ! फडणवीसांचा गौप्यस्फोट

News Desk

राज्यभरातील अकृषी विद्यापीठे, महाविद्यालयात ‘NCC Studies’ या वैकल्पिक विषयाला मान्यता!

News Desk