HW News Marathi
महाराष्ट्र

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या…

मुंबई | भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण असल्याचं वक्तव्य निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केलं आहे. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणं सोपं नाही असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हे अतिशय बेजबाबदार विधान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे”.

काय म्हणाले अमिताभ कांत?

“भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण आहे. देशाला स्पर्धात्मक करण्यासाठी आणखी सुधारणांची आवश्यकता आहे, परंतु भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं अवघड जातं. अशा सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. त्या करण्याची इच्छाशक्ती या सरकारने दर्शवली आहे,” असं कांत यांनी सांगितलं. केंद्र सरकार सर्वच क्षेत्रांत कठोर सुधारणा करीत असल्याचे कांत यांनी प्रथमच ‘स्वराज्य’ नियतकालिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, “खणिकर्म, कोळसा, कामगार, कृषीसह जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत, परंतु त्या राबवणे कठीण जात आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, राऊतांचा आरोप

Aprna

‘राजगड’समोर फेरीवाले, मनसेचा पालिकेच्या निर्णयाविरोधात मोर्चा

swarit

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार! – मुख्यमंत्री

Aprna