HW News Marathi
महाराष्ट्र

एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकीय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म | प्राजक्त तनपुरे

मुंबई | एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकीय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. तनपुरे पुढे म्हणाले, “फक्त पोपटपंची करण्याव्यतिरिक्त स्वतःचे असे कुठलेही कर्तृत्व नसलेल्या पडळकरांनी अवघ्या महाराष्ट्राने स्वीकारलेल्या नेतृत्वावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणे योग्य नाही, तारतम्य बाळगा,” असे ट्वीट करत पडळकरांना इशारा दिला आहे.

महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली असून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिले आहे.

गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले

‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, ‘अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संबंधित बातम्या

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ‘आघाडी’!

News Desk

“देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!” – जयंत पाटील

News Desk

“पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर राजीनामा द्या”, सुप्रिया सुळे भडकल्या

News Desk