HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

मुंबई | महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली असून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिले आहे.

बहुजनांच्या पाठीत खंजीर खुपसणारे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारसाहेबांवर टीका करणे योग्य नाही. आधी बहुजन वर्गासाठी काय केले याचं आत्मपरीक्षण पडळकर यांनी करावे असे आव्हानही महेश तपासे यांनी दिले आहे. सत्तेसाठी धर्मवादी पक्षासोबत गेलात आणि बहुजनांचा विश्वासघात केलात असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले

‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, ‘अशी टीका बोचरी भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

संबंधित बातम्या

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविद्यालयांना लैंगिक छळ विरोधी माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणं अनिवार्य असल्याची महिला व बालकल्याण मंत्र्यांची माहिती!

News Desk

‘आव्हान-२०१७’ आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी स्वारातीम विद्यापीठाचा संघ कोल्हापूरला रवाना

News Desk

मराठी माणूस मेला तरी सवतीच्या पोराला सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे, सामनातून हल्लाबोल

News Desk