HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या एक दिग्गज नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नांदेड | भाजप नेते नागनाथ घिसेवाड यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.

भोकर तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज घिसेवाड यांच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये काँग्रेसला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण भोकरमध्ये पक्ष वाढीचे काम करणार असल्याचं नागनाथ घिसेवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

नागनाथ घिसेवाड हे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता.

1999 मध्ये विधानसभा निवडणुकीत तर ते अवघ्या 500 मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभेला ते दोन हजार मतांनी मागे पडले. दोन्ही वेळा ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. तेव्हापासून बहुजन नेते अशी त्यांची ओळख झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये काम करायला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र स्थानिक पातळीवर असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून ते आता काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या मतदानाला सुरुवात, जाणून घ्या सकाळपासून किती टक्के झाले मतदान…

News Desk

स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून या विभागासाठी ११४३ कोटींची तरतूद! – मुख्यमंत्री

Aprna

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk