HW News Marathi
महाराष्ट्र

पालकमंत्री सतेज पाटील यांचा शब्द पडू देणार नाही अशी कामगिरी करू –  जयंत आसगावकर

कोल्हापूर | विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा ऋणी असून त्यांच्यामुळेच आपल्याला मताधिक्या मिळाले आहे. त्यांचा कोणताही शब्द पडू देणार नाही अशी कामगिरी करू अशी ग्वाही नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी दिली.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांचे आज दुपारी कोल्हापुरात आगमन झाले. ते पुण्यातून आल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात येऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा बुके देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी नूतन आमदार आसगावकर यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलतांना नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी विधान परिषदेच्या शिक्षक मदतदार संघात आपल्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी संधी दिली. त्यांच्या सहकार्यामुळे मला या निवडणुकीत मताधिक्य मिळवता आहे. त्यामुळं पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही अशी कामगिरी करू अशी ग्वाही नूतन आमदार जयंत आसगावकर यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे!”, भाजपचा सरकारवर निशाणा

News Desk

आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार

News Desk