HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड, शरद पवारांचे वक्तव्य

नागपूर । राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटी दरम्यान उपस्थितांसोबत पवारांनी हे वक्तव्य केले. शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) संध्याकाळी पवार यांनी मेकोसाबाग परिसरात आदिवासी परिषदेत सहभागी झाल्यानंतर कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

राऊत यांच्या भेटीवेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी १७ नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्यावा या भीष्माचार्याने, अशी आमची इच्छा आहे, असे डॉ. भाऊ लोखंडे पवारांना म्हणाले. यावर उत्तर देताना पवार यांनी १७ ला अवघड आहे. अजून भरपूर वेळ लागेल’, असे उत्तर दिले.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरु आहे. तसेच तिन्ही पक्षाचे हे सरकार ५ वर्ष चालावे यावर आमची नजर राहील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उद्या (१६ नोव्हेंबर)असल्याने या दिवशी सरकार स्थापन व्हावे, असे शिवसेना नेत्यांचे प्रयत्न व शिवसैनिकांची इच्छा असल्याची चर्चा आहे.

या बैठकीला काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चुकीला माफी नाही”, पडळकरांच्या हल्ल्यावर अजित पवारांचं भाष्य!

News Desk

भीमा-कोरेगाव अभिवादनासाठी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आजाद १ जानेवारीला उपस्थित राहणार

News Desk

वांद्रे शासकीय वसाहतीत मागील दोन पिढ्यांपासून राहणाऱ्या ४७०० कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर त्याच ठिकाणी मिळवून देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे – किरण पावसकर

Sanjay Jog