HW News Marathi
महाराष्ट्र

वांद्रे शासकीय वसाहतीत मागील दोन पिढ्यांपासून राहणाऱ्या ४७०० कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर त्याच ठिकाणी मिळवून देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे – किरण पावसकर

येथील नागरिक गेली 20 वर्षे प्रयत्न करत होते, या लोकांना त्यांचे काम कसे होणार नाही हे न सांगता राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय करता येऊ शकतं, हे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने दाखवून दिलं – किरण पावसकर.

वांद्रे शासकीय वसाहत येथे राहणारे शासकीय कर्मचारी, ज्यांच्या दोन पिढ्यानी सरकारची सेवा केली आहे, अशा ४७०० कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मागील २० वर्षांपासून राहायला हक्काची घरे त्याच ठिकाणी मिळावीत म्हणून प्रयत्न करत आहेत. मातोश्रीपासून काही अंतरावर ही वसाहत आहे. तेथील नागरिक मातोश्रीवर सुद्धा दाद मागायला गेले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणूस मुंबईबाहेर जाता कामा नये, असे वारंवार सांगायचे. त्याच शिवसेनाप्रमुखांचा विचार, त्यांचा आदेश मानून बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काल वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या शासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ४७०० कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर त्याच ठिकाणी मिळवून देण्याचा निर्णय घेतला व त्यांसंदर्भाची घोषणा देखील केली आणि याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देखील दिले आहेत, हा निर्णय ऐतिहासिक आहे, अशी माहिती शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले .

किरण पावसकर पुढे म्हणाले की, दोन पिढ्या राहून सुद्धा या वसाहतीत राहणाऱ्या लोकांना दाद मिळत नव्हती. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांनी येथील नागरिकांचा राहत्या ठिकाणी पुनर्विकास होणार असा निर्णय दिला व त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. यापूर्वी अनेक जण येऊन गेले. ते काम कसं होणार नाही. हेच सांगायचे. मात्र राजकिय इच्छाशक्ती असेल तर काय करता येऊ शकतं, हे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने दाखवून दिले. यातील ३८०० कुटुंबियांना या वसाहतींमध्ये घरे मिळणार आहेत. यामध्ये १६ इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यातील १४ इमारतीत या सरकारी कर्मचार्यांना घर दिली जाणार आहेत. एक इमारत वसतिगृहाला दिली जाणार आहे.

तसेच आज गिरणी कामगार, इतर पुनर्विकासाचे प्रकल्प, एसआरएचे प्रकल्प जिथे बिल्डर सोडून गेला आहे असे रखडलेले प्रकल्प, हे प्रकल्प देखील राज्य सरकार लक्ष घालून पूर्णत्वास नेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईच्या बाहेर गेलेल्या प्रत्येक मराठी माणसाला मुंबईत त्याचे हक्काचे घर मिळवून देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत राहणारा मराठी माणूस बाहेर जाऊ नये, गेला असेल तर तो परत मुंबईत यावा, याच या निर्णयामागचा हेतू आहे. या निर्णयाचे सर्व श्रेय सरकारच्या सकारात्मक भूमिकेला द्यावे लागेल.

शासकीय वसाहती जवळ मातोश्रीमध्ये राहून पिता मुख्यमंत्री आणि पुत्र कॅबिनेट मंत्री असूनसुद्धा त्यांनी या शासकीय वसाहतींचा विकास केला नाही आणि हे आज आम्हाला मिंधे-मिंधे म्हणून हिणवतात. पण मी म्हणतो की हो आम्ही मिंधे आहोत, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मिंधे आहोत, हिंदुत्व सांभाळण्यासाठी आणि मराठी माणसाच्या मागे उभे राहण्यासाठी आम्ही मिंधे आहोत, शिवसेनाप्रमुखांचे विचार मांडण्यासाठी आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही मिंधे आहोत. मातोश्रीवर राहणारे मुख्यमंत्री असताना शासकीय कर्मचाऱ्यांना मातोश्रीवर बोलवायचे, सहा-सहा तास ताटकळत ठेवायचे पण कधीही या शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावे असे त्यांना वाटले नाही. यांना फक्त हा १३८ एकरचा भूखंड बिल्डरांच्या हाती देऊन, त्याचे श्रीखंड फक्त खायचे होते, असे किरण पावसकर म्हणाले.

किरण पावसकर पुढे म्हणाले की, दसरा मेळाव्यामध्ये विचाराचं सोनं लुटण्यासाठी यावे असे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, त्याच शिवतीर्थावर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीचे आपण विचार सांगणार आहात का ? ज्या जागेवर बाळासाहेबांनी भ्रष्टाचारी काॅग्रेसला गाडा, असे म्हटलं होतं, त्याच जागेवर उद्धव ठाकरे काॅग्रेसचं गुणगान गाणार आहेत….हेच बाळासाहेबांचे विचार होते का? असा सवाल किरण पावसकर यांनी उपस्थित केला. शिवतीर्थावर काय विचार घेऊन जायला हवेत, शिवतीर्थ हे धगधगत राहिलं पाहिजे असे बाळासाहेब म्हणायचे. मात्र उद्धव ठाकरे या धगधगत्या निखाऱ्यावर पाणी ओतत आहे, अशी टीका देखील किरण पावसकर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त!

News Desk

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

Aprna

महाराष्ट्रात आणीबाणी लावा! महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने लिहिलं चक्क मोदींना पत्र

News Desk