HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (१७ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजता भेट घेणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दिल्लीत बैठका होणार आहे. भेटीदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही वेगवेगळ्या विचारणसणीचे पक्ष राज्यात सत्ता स्थापनेपूर्वी यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रामचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे पाठविला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटले यांनी सोनिया गांधींकडे हा अहवाल पाठविला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या दोघांच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

तसेच या बैठकीला काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनानंतर आता औरंगाबादमध्ये सारी आजाराचा शिरकाव

News Desk

HW Exclusive: विमाच न घेतलेल्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला !

News Desk

पार्थ पवार यांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू, चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

News Desk