HW News Marathi
Uncategorized

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रवास आता प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेकडे !

आरती मोरे | बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापनदिन आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेलीशिवसेना आज महाराष्ट्राच्या राजकारणात भक्कम पाय रोवून उभी आहे. पण बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ते सध्या राज्यातउद्धव ठाकरेंची सेना यात तफावत आहे. या ५४ वर्षांत शिवसेना कशी बदलली ?

सध्या महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मराठी बाणा आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेलीशिवसेना आज धर्मनिरपेक्षतेची भूमिका असलेल्या काँग्रेससोबत महाराष्ट्रात सरकार चालवत आहे. म्हणूनच बाळासाहेबांची शिवसेना तेउद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये बरेच बदल झाले आहेत

शिवसेनेत ५४ वर्षात काय बदललं ?

याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणतात महत्वाचा बदल म्हणजे शिवसेना थेट सत्तेत आली. २०१९ ला, वैचारिक मर्यादा ओलांडून सेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचं धाडसंकेलं, ठाकरे मुख्यमंत्री झाले. या विषयी बोलताना समाजसेवक आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी म्हणतात की मराठीमाणसाच्या हक्कासाठी आणि दाक्षिणात्यांच्या विरोधात उभी राहिलेली सेना मुख्यत: मराठी माणसाच्या अर्थकारणासाठी निर्माणझाली पण बदल म्हणालं तर सेनेने अर्थकारण ते राजकारण असा यशस्वी प्रवास केला. जे शेतकरी संघटक म्हणुन शरद जोशींना जमलं नाही ते सेनेने केलं,सेनेने आपली व्यापकता वाढवली. शाखेच्या माध्यमातून सेनेने सामान्यांची तळमळ सोडवली. एक उत्तम केडर नेतृत्व शिवसेनेकडे दिसतं. विश्वंभर चौधरी म्हणतात माझं सेनेच्या लोकांशी वैचारिक पातळींवर मतभेद असले तरी वैयक्तिक आयुष्यात सेनेच्या लोकांचे चांगले अनुभव मला आहेत.

बाळासाहेबांची सेना ते उद्धव ठाकरेंची शिवसेना

विजय चोरमारे म्हणतात ,बाळासाहेबांनी खेडोपाड्यांतल्या लोकांना जमवून शिवसेना उभी केली. लोकांना मुंबईच्या राजकीय प्रवाहात आणलं तर उद्धव ठाकरेंना ही जमवाजमव करावी लागली नाही, ते थेट मॅनेजर झाले. आजवर ठाकरे कुटुंब प्रत्यक्ष पद स्वीकारून राजकारणात सामिल झालं नाही, मात्र उद्धव आणि आदित्य सध्या थेट सरकरामध्येमंत्री आहेत. आदित्य ठाकरेंना तरूण वयात राजकारणाचा थेट अनुभव मिळतोय ज्यामुळे शिवसेनेसाठी भविषयकाळचांगला असेल. विश्वंभर चौधरी यांच्या मते बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे आणि आदित्यंची शिवसेना यामध्येकाही सकारात्मक बदल झाले आहेत आणि काही नकारात्मक बदलसुद्धा आहेत .सकारात्मक बदल जर आपण पाहिले तर त्यामध्ये मुख्यतः बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मुस्लिमद्वेष होता मात्र उद्धव ठाकरे यांची हिंदूत्वाची व्याख्या वेगळी आहे आणित्यांच्या सेनेत मुस्लिम लोकांचा द्वेष करता हिंदूंची अस्मिता जपणे हे महत्त्वाचं असल्याचं पाहायला मिळतं.दुसरीकडे उद्धवठाकरेंमध्ये पॉलिटिकल डिसेन्सी मोठ्या प्रमाणात आहे असं विश्वंभर चौधरी सांगतात . उद्धव ठाकरे हे डिसेंट आहेतच परंतु तेॲक्सेसिबल सुद्धा आहेत ही सकारात्मक गोष्ट आहे असं सुद्धा ते म्हणतात.जर या बदललेल्या शिवसेनेच्या नकारात्मक काही बाबा पाहिल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेत बाळासाहेब आणि मातोश्री ही सत्ताकेंद्र होती अगदी लालकृष्ण अडवाणींपासून अटल बिहारी वाजपेयी ,अमित शहा यांना जर शिवसेनाप्रमुखांशी बोलायचं असेल तर त्यांना मातोश्रीवर यायला लागायचं.उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये याच शिवसेनेचं सत्ताकेंद्र बदलले. हे सत्ताकेंद्र मातोश्री राहिलेलेनसून ते सिल्वर ओक झाले असे मत विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलयं .याच बाबतीत बोलताना ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात त्यांना राजकीय पद किंवा काहीच नको होते मात्र आता सध्या उद्धव ठाकरे प्रत्यक्ष राजकारणात असताना काही राजकीय गोष्टी हव्या असतील तर पडती बाजू घ्यावीच लागते तसेच सध्या उद्धव ठाकरे करताना दिसतात.मात्र यामुळे कुठेतरी रिमोट कंट्रोल जो आहे तो शिवसेनेकडून गेलेला दिसतो आणि हाच मुद्दा कदाचित कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिकांना पटत नाही आणि म्हणूनच ते सध्या शिवसेनेच्या विरोधात जाण्याचा धोका निर्माण झालाय .

शिवसेनेची विचारसरणी आणि भविष्य

महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेने कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेची विचारसरणी बदलली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे त्यावर विजय चोरमारे म्हणतात की शिवसेना आत्ता धर्मनिरपेक्षतेकडे झुकली आहे असे म्हणता येणार नाही कारण शिवसेना कधीच कट्टरहिंदुत्ववादी नव्हती.शिवसेना ही मराठी माणसासाठी होती कालांतराने राजकीय पार्श्वभूमी साठी ती हिंदुत्ववादी झाली .भाजप आणि आरएसएससारखे कट्टर हिंदूत्ववादी विचार आणि समाजात द्वेष पोहोचवणं यासाठी शिवसेना ओळखली जात नाही. प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा धर्मनिरपेक्ष विचार मांडले होते त्यामुळे सध्याची सेना ही बाळासाहेब ठाकरेंकडून प्रबोधनकार ठाकरेंकडे जाणारी सेनाआहे असे म्हणता येईल.विश्वंभर चौधरी म्हणतात की कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेने सध्या कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात धोका पत्करला आहे . याआधी कट्टर शिवसैनिक सत्तांकांक्षी नव्हते पण आता सत्ता सगळ्यांना हवी आहे. पुढच्या वर्षांतकाहीही होऊ शकते. जागावाटपाबाबत वाद होणार हे तर साहजिकच आहे. मात्र आता सेनेने संघटना वाढवणं आणि पक्ष वाढवण हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करायला हवी .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येणार!

News Desk

Belgaum निवडणुकीत BJP ची सरशी…Sanjay Raut यांचा अपेक्षाभंग ?

News Desk

“भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर केंद्र सरकारने सर्वांवर GST लावला,” सुप्रिया सुळेंचा टोला

Aprna