HW News Marathi
महाराष्ट्र

योगी आदित्यनाथ उद्या मुंबईत येणार, उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्याच्या संदर्भात घेणार बैठक

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या २ डिसेंबर) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. त्याच संदर्भात योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. आज रात्री योगी आदित्यनाथ लखनऊहून मुंबईसाठी रवाना होतील. २ डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. अनेक सेलिब्रेटींनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी लखनऊतही बैठक घेतली होती. दरम्यान, सत्ताधारी सत्तेने या गोष्टीला विरोध केला आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

केंद्राकडून मुंबईचे महत्व कमी करण्याची प्रयत्न – सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी बॉलीवूड तिकडे साकारणं शक्य नाही. केंद्र सरकारकडून सातत्याने मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्याचाच हा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा रद्द, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्गाची परीक्षा होणार

News Desk

आणखी दोन राजकीय कुटुंबात जुळली सोयरीक…

Aprna

“दरेकरांना काय आरोप करावे याचं भान राहिलं नाही”, रूपाली चाकणकरांनी सुनावलं!

News Desk