HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय घडामोडींना वेग, सत्तास्थापनेच्या दृष्टीने राज्यात दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप सरकार स्थापन झाले नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा सोडण्यासाठी आज (७ नोव्हेंबर) राज्यात आणि केंद्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावरून हटून बसली आहे. तर भाजप काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र, भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाहीत, असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासाठी नाही तर राज्यातील ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दुपारी २ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आजच त्यांच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री निवासस्थानी सकाळी ११.३० वाजता बैठक बोलविण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते आज दिल्लीत हायकंमांड सोनिया गांधीची सायंकाळी भेट घेणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे ९० टक्के आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींची यांच्या भेटीत सत्तास्थापनेबाबत काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काॅबिनेट मंत्री नितीन गडकरी आज सायंकाळी ६.३० वाजता आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असून या भेटीचे महत्त्व आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांची कराडमध्ये दुपारी २ वाजता भेट होणार आहे.

 

 

Related posts

आर्थिक निकषावरील आरक्षण न्यायालयात टिकणे अशक्य!

News Desk

शरद पवारांची गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट!

News Desk

आर्यन खान प्रकरणी चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk