HW News Marathi
महाराष्ट्र

सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारकी मिळवणारे मातब्बर नेते भारत भालके!

मुंबई | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे काल (२७ नोव्हेंबर) निधन झाले. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीवर शोककळा पसरली आहे. भारत भालके यांचा थेट जनतेशी संपर्क होता. स्वभावानं बेधडक असलेल्या भालके यांच्याशी कार्यकर्त्यांचाही थेट संपर्क असायचा. जनतेशी दांडगा संपर्क असल्यानंच सलग तीन वेळा ते विधानसभेत पोहोचले होते.

भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते.

२०१९च्या निवडणुकीत काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आणि जेष्ठ आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करत आमदारकीची हॅट्ट्रिक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्नसुद्धा भाजपचे गाजरच !

News Desk

कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना! नितेश राणेंनी डिवचलं

News Desk

“माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं” – चित्रा वाघ

News Desk