HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या वडिलांचे निधन

मुंबई | सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना आज पितृशोक झाला आहे. रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे आज (१५ जून) निधन झाले आहे. माधव पाटणकर वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माधव पाटणकर यांनी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालावली.

माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे ट्वीट करत म्हटले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध, रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे | औषध प्रशासनमंत्री

News Desk

#Lockdown : तेलंगणा राज्याचा लॉकडाऊन २९ मेपर्यंत वाढवण्यात आला

News Desk

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

News Desk