HW News Marathi
Covid-19

 राज्यात लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | संपूर्ण जगभरात आणि देशात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार काही महत्वाची पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (२४ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिऔ कॉन्फरन्सच्या माधअयमातून संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.

‘कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरार रूग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी । छगन भुजबळ 

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश !

Arati More

ठाकरे सरकारची नवी नियमावली जारी, ‘या’ वेळेतच किराणा, भाजीपाला घेता येणार!

News Desk