HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे, त्यांनी राग मानून घेऊ नये – जयंत पाटील  

पुणे | राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्ला केला आहे. पुणे पदवीधर निवडणूक प्रचारासाठी आले असता, जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, कोरोनाचं संकट, भाजपची भूमिका अशा विविध विषयावर भाष्य केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील असे म्हणाले की,देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये, असा टिपणी त्यांनी केली.

जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “राज्यपाल सुद्धा आता पहाटे काही करत नसतील. राजकारणात अशा गोष्टी चालतात. कटू आठवणी नको आता”, असे वक्तव्य जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर केले.

पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंद झाली आहे. त्यासंदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत. मतदार याद्या उशिरा जाहीर झाल्या. दुबार नावे, एकच मोबाईल नंबर, पत्ते चुकीचे अशा त्रुटी आहेत. प्रचारयंत्रणा पोहोचू नये यासाठी कुणीतरी केले आहे. निवडणूक आयोगाकडून त्याबाबत चौकशी व्हावी, असं जयंत पाटील म्हणाले.

सततच्या लॉकडाऊनमुळे सरकारवर आर्थिक बोजा, दिवाळीची गर्दी वाढली म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एकत्रित लोकं भेटल्यावर कोरोना वाढतो, हा आमचा अनुभव आहे. कोरोनाच्या काळात भाजपने जेवढी संधी मिळेल तेवढे राजकरण केलं, यावरून एक बेजबाबदार विरोधी पक्ष आम्हाला दिसला, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदवीधर निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला. यावर जयंत पाटील म्हणाले, “बरं झालं पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल असं दरेकर बोलले, निवडणुकीच्या आधी बोलले नाहीत. मात्र राज्याला आता भाजप सरकारची गरज नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती! – उपमुख्यमंत्री

Aprna

पोलीस दलाच्या अत्याधुनिक कार्यपद्धतीमुळे जनमानसात पोलीसांप्रति विश्वासार्हता! – जयंत पाटील

Aprna

नालासोपाऱ्यातील ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णाने स्वत: हून महापौरांना दिली माहिती

swarit