HW News Marathi
महाराष्ट्र

संत तुकोबांच्या पालखीचे दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान

पुणे | संत तुकोबांची पालखी आज (१२ जून) दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान करणार आहे. राज्यातील कोरोनास्थितीमुळे पहिल्यांदाच या पालखी सोहळ्यात अगदी मोजक्याच वारकऱ्यांचा सहभाग असणार असल्याचे सांगितले जात आहे. केवळ ५० जणांना या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. दरवर्षी तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानावेळी इंद्रायणीचा काठ माउलींच्या सहवासाने गजबजलेला असतो. मात्र, यंदा इंद्रायणीचा काठही निर्मनुष्य पाहायला मिळाला आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याला कोरोनामुळे यंदा इतिहासात पहिल्यांदाच अगदी सध्या पद्धतीने हा सोहळा करावा लागणार आहे. आपली सगळी सुख-दुःख विसरून पंढरीच्या वारीत पालखी सोहळ्याच्या निमित्ताने माउली विठुरायाच्या नामात दंग होतात. यंदा मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या पालखी सोहळ्यावर अनेक निर्बंध असल्याने माउलींना प्रत्यक्ष या सोहळ्यात सहभागी होता येणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच कारवाईअधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल! – प्रविण दरेकर

Aprna

मेट्रो रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे लातूरमध्ये भूमीपूजन

News Desk

शरद पवारांच्या ‘त्या’ वायरल पत्रावर राष्ट्रवादीकडून आले स्पष्टीकरण…

News Desk