HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश आणि आता थेट प्रवक्तेपदाची बक्षिसी

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिवसेनेत प्रवेश केलेल्या तिघा जणांना प्रवक्तेपद देण्यात आले आहे. सचिन अहिर, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह आनंद दुबे यांनाही प्रवक्तेपदी स्थान मिळालं आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर, विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या पाच महिन्यांच्या काळात काँग्रेसला चांगलीच गळती लागली होती. काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते आनंद दुबे यांनीही शिवबंधन बांधले होते.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुबेंनीही आपल्या सर्व पदांचा त्याग केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दुबेंनी जुलै २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आनंद दुबे यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. दुबेंच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतदारांना शिवसेना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हं आहेत.

आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांना बक्षिसीआदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांची गेल्या वर्षीच प्रवक्तेपदी नियुक्ती झाली होती. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना मागे सारत त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली होती. तर आदित्य ठाकरेंना वरळीतून विधानसभेवर पाठवण्यात मोठा वाटा असलेल्या सचिन अहिर यांनाही आधीच शिवसेनेचं उपनेतेपद मिळालं होतं. त्यातच आता प्रवक्तेपदाची भर पडली आहे.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते

प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार

अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री

सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)

सुनील प्रभू – आमदार (मुंबई)

प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)

भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)

अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)

मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)

किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)

डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)

किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)

संजना घाडी (नवीन वर्णी)

आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)

नव्या यादीतकोणाला स्थान मिळाले नाही?

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)

डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री

उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अहमदनगर’ जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करा”, पडळकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

Aprna

अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

News Desk

तेजस ठाकरे राजकारणात येणार ? वरूण सरदेसाई म्हणतात…

News Desk