HW News Marathi
महाराष्ट्र

एकदा कोरोना डोस घेऊन काम होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती जनतेला देत अनेक सतर्कतेचे इशारे दिले आहेत. अद्याप आपल्या हातात कोरोनाची लस आलेली नाही आणि ती कधी मिळणार हेही अधांतरिच आहे. मात्र, एकदा कोरोना डोस घेऊन काम होणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना गाफिल न राहता हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आजही कोरोनाची लस आपल्या हातात आलेली नाही. काल-परवाही मी काही लोकांशी बोललो येते-येते-येते असं म्हणतात, पण अजून हातात तर काही आलेली नाही. डिसेंबरमध्ये येईल का, जानेवारीत येईल का, फेब्रुवारीत येईल का, मार्चमध्ये येईल का? काहीच माहिती नाही. बरं डिसेंबरमध्ये आली तरी महाराष्ट्रात बारा-साडेबारा कोटी जनता आहे. या सर्वांना ही लस द्यायचं आव्हान आहे. बरं एकदा कोरोना लस देऊन बरं होणार नाही. या कंपन्यांच्या लस दोन टप्प्यात दिल्या जात आहेत. आधी साधा डोस आणि नंतर बुस्टर डोस द्यावा लागत आहे.

अनेकजण कोरोना झाल्यानंतर बरे होतात. अगदी सौम्य कोरोना संसर्गापासून तर गंभीर कोरोना झालेले रुग्ण बरे होत आहेत. मात्र, पोस्ट कोविड ही नवी गोष्ट समोर आली आहे. कोरोना होऊन गेल्यावर शरीरावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होताना दिसत आहेत. हे दुष्परिणाम मेंदू, फुफ्फुस, किडनी, पोट आणि श्वसन संस्था यावर जास्त होत आहे,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

Manasi Devkar

Maharashtra Budget 2021-22 : विकेल ते पिकेल योजनेसाठी २१०० कोटी – अजित पवार

News Desk