HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार लोकविरोधी सरकार आहे – देवेंद्र फडणवीस

नागपूर | राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी आहे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.

हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटतं, लॉकडाऊनमध्ये वीज बिलात सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या. तीन कॅबिनेट मंत्र्यांनी याची घोषणा केली होती. आता म्हणाले अभ्यास झाला नाही त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लॉकडाऊनमध्ये आलेली वीजबिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी लोकांचा विश्वासघात केला, असं फडणवीसांनी म्हटले आहे. भाजप सतत सरकारवर टीका करत असतेच. आज पुन्हा एकदा फडणवीसांनी निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Aprna

प्रदीप शर्मांच्या घरावर NIA ने छापा टाकल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk

CBSE कडून १०वी-१२वीच्या वेळापत्रकात बदल

News Desk