HW News Marathi
महाराष्ट्र

ऑक्सफोर्ड-केम्ब्रिज विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा सुरू, पण शरद पवारांना माहिती नाही !

मुंबई | महाराष्ट्रात सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवर वक्तव्य करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला होता. पवारांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठांनीही परीक्षा रद्द केल्या आहेत, असा दावा केला होता. शरद पवार यांचा दावा भाजप नेते विनोद तावडे यांनी खोडून काढला आहे. राज्यपाल ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठापेक्षा जास्त हुशार आहेत की नाही माहिती नाही. मात्र, त्यांना सत्य माहिती आहे, असे प्रत्युत्तर विनोद तावडेंनी देत शरद पवार आणि राज्यपाल यांच्या वादात उडी घेतली आहे.

विनोद तावडे म्हणाले, “जग प्रसिद्ध ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत. हे शरद पवारांना माहिती नाही, असे होऊच शकत नाही. मग आपल्या सरकारने घेतलेला चुकीचा निर्णयावर पाघरून घालण्यासाठी राज्यपालांसारख्या घटनात्मक पदावरच्या व्यक्तींवर टीका करणे हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पटण्यासारखे नाही. देशातील आय.आय.टी सारख्या ठिकाणी सुद्धा वर्षभर मूल्यमापन केले जाते आहे. सरकार तुमचे आहे, तुम्हाला परीक्षा न घेता सरसकट जर ४५ टक्के विद्यार्थ्यांना नापास करायचे असेल. तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. मात्र, जे खरे आहे ते सांगा अर्धसत्य सांगू नका,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

शरद पवार नेमके काय म्हणाले?

‘राज्यात अनेक शिक्षण संस्थांच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. आयआयटीने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफर्ड विद्यापीठाने ही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठे असेल. अगदीच कोणी काही चुकीचे केले असा निष्कर्ष काढला, असे म्हणत त्यांच्यावर शरद पवार यांनी टीका केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ;राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी

Aprna

पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग

Aprna

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजवर्धन हंगरगेकर चेन्नई सुपर किंग्समधून खेळणार

Aprna