मुंबई | गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेना रस्सीखेच सुरू आहे. “उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले की, शिवसेनेकडे दुसरे पर्याय आहेत. मात्र ते पर्याय स्वीकारण्याचे पाप आम्ही करणार नाही. शिवसेना राजकारणात नेहमीच सत्याला महत्त्व देते. आम्ही सत्तेचे भुकेलो नाही, ” युतीसंदर्भात ज्वलंत प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एएनआयला दिली आहे.
S Raut on being asked 'why it's taking time to form govt despite pre-poll alliance with BJP': There is no Dushyant here whose father is in jail. Here it's us who do politics of 'dharma & satya',Sharad ji who created an environment against BJP &Congress who will never go with BJP. https://t.co/aHADYgz6wH
— ANI (@ANI) October 29, 2019
महाराष्ट्र सरकार स्थापन होण्यास इतका वेळ का? लागत आहे, असा सवाल पत्रकारांनी राऊतांना विचारला होता. यावर राऊत म्हणाले की, ” हरियाणांनाप्रमाणे महाराष्ट्रात कोणतेही दुष्यंत यांचे वडील तुरुंगात नाही, असे म्हणत राऊत यांनी हरियाणातील चौटाला कुटुंबियांवर निशाणा साधला. दरम्यान “आम्ही धर्म आणि सत्याचे राजकारण करतो, शरद पवार हे भाजप आणि काँग्रेसविरोधी वातावरण तयार करत असून काँग्रेस कधीच भाजपबरोबर जाणार नाहीत, असे म्हणत राऊत यांनी शब्दात पवारांवर टीका केली. “
गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला. तर भाजपचे १०५ उमेदवार यशस्वी ठरले आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी विधानसभेत १४५ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.