HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमुळेच वीजबिल माफ होत नाहीये !, माजी उर्जामंत्र्यांचा आरोप

कोरोनाचा काळात सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकांचा नोकऱ्या गेल्या. अशात वीज बिल पाहून तर सोकांना शॉकच बसला होता. या वाढीव वीज बिलावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. वीज बिल सरकार कमी करेल अशी आशा असताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी असे सांगितले की कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही. त्यानंतर भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे, राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहे. “वीजबिल माफीसाठी ऊर्जामंत्री प्रयत्नशील आहेत मात्र उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची त्यांना साथ नाही. म्हणून ते माफ होऊ शकले नाही, असा आरोप बावनकुळेंनी केला आहे.

#UddhavThackeray #AjitPawar #NitinRaut #ChandrashekharBawankule #ElectricityBill #Maharashtra #Covid-19 #Corona #PravinDarekar #AtulBhatkhalkar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या विरोधात ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar आक्रमक

News Desk

ShivSena-BJP ‘फोटो वॉर’; काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Manasi Devkar

सत्तासंघर्षाचा निकाल Uddhav Thackeray यांच्या बाजूने लागला तर…?

Manasi Devkar