HW News Marathi
Covid-19

HW Exclusive : अबब…एका महिन्यात कमावले साडे चार लाख रुपये !

हेमंत गडकरी | एक एकर शेतीत फक्त एका महिन्यात तब्बल साडेचार लाख रुपये कमावले, काय विश्वास बसत नाही. मात्र, हे खरे आहे. बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावातील मळशी भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने केवळ एक एकर कोथिंबीरीच्या शेतात एका महिन्यात चार लाख एकावन्न हजार रुपये कमावले आहेत.

अविनाश जगताप असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जगताप यांचे मुख्य पीक ऊस आहे. मात्र, उसाबरोबरच ते टोमॅटो, काकडी, कारले, मिरची व कोथिंबीर अशी तरकारी करतात. मात्र, या वर्षी त्यांच्या कोथिंबीरीला अनेक वर्षातील उच्चांकी दर मिळाला आहे. त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतातील सर्व कामे ते आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत करतात. अनिकेत, करण, केतन व प्रणाली यांच्या मदतीने त्यांनी आपल्या शेतात कोथिंबीरीचा मळा फुलवला आहे. लॉकडाउनच्या दरम्यान सर्वच शेतमालाचे दर कोसळले होते. मात्र लॉकडाउन थोडे शिथिल होताच त्यांच्या कोथिंबीरीला एका एकराला चार लाख एकावन्न हजारांचा दर मिळाला.

इतकेच नाही तर मुरूम व वाणेवाडी परिसरात आढावा घेतला असता जवळपास विविध शेतकऱ्यांनी २७ एकरांत कोथिंबीर केली असून त्यातून त्यांना सुमारे ५५ लाख रुपये मिळाले आहेत. याचा अर्थ असा की एकराला सरासरी २ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे कोथिंबीर या पिकाने परिसरातील शेतकऱ्यांना लखपती केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊन काळात कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत ६३ हजार गुन्हे दाखल, पोलीस विभागाची माहिती

News Desk

आकडा वाढला ! राज्यात आज तब्बल १३ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

News Desk

गो कोरोना गो म्हणणाऱ्या रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

News Desk