मुंबई | एकीकडे देशात कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही एक ट्विट केले आहे. चीनी मालावर बहिष्कार घालण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे.
“ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आज पुण्यात चीनी मालाची होळी करत आहेत. वीर सावरकरांनी परदेशी मालाची होळी करण्यासाठी जी जागा निवडली तेथेच हे आंदोलन होत आहे. चीनचे आर्थिक कंबरडे मोडून काढणे हाच एक surgical strike आहे. चीनला धडा शिकवावा लागेल. वंदे मातरम!” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
https://t.co/YUPLvKB2EU
ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते
आज पुण्यात चिनी मालाची होळी करत आहेत. विर सावरकरांनी परदेशी मालाची होळी करण्यासाठी जी जागा निवडली तेथेच हे आंदोलन होत आहे. चिनचे आर्थीक कंबरडे मोडून काढणे हाच एक surgical strike आहे. चीनला धडा शिकवावा लागेल.
वंदे मातरम!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.