HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली – राम कदम 

मुंबई | महाराष्ट्र सरकारने केवळ अहंकारापोटी इतके दिवस राज्यातील मंदिरे बंद ठेवली. नियम पाळून मंदिरे सुरु करायची होती तर ती आधीच का केली नाहीत? त्यामुळे जनतेने आज महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात लगावली आहे, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. तसेच आम्ही पालघर साधू हत्याकांड अजून विसरलेलो नाही. पालघर हत्याकांडाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे सोपवण्याची मागणी आता आम्ही उचलून धरणार आहोत. किमान आता तरी या अहंकारी सरकारला सद्बुद्धी यावी, असे वक्तव्य राम कदम यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे सोमवारपासून खुली झाली. यानिमित्ताने भाजपकडून राज्यभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनी सोमवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली आहे. अटी घालून मंदिरे उघडायची होती तर हे आधी करता आले नसते का? भक्तांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यांनी महाविकासआघाडी सरकारला कदापी माफ करू नये, असे राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

तसेच भाजपला पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा विसर पडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, ही आमची मागणी आहे. आज चित्रगुप्त पाप-पुण्याचा हिशेब लिहत असले तर तोदेखील महाविकासआघाडी सरकारला यासाठी शाप देईल, अशी टीका राम कदम यांनी केली.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे राज्य सरकार मंदिरे उघडण्यास तयार नव्हते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुंबईसह राज्यभरात मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली होती. अखेर आजपासून मंदिरे खुली झाल्याने भाजपच्या नेत्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद हा नवा ‘महात्मा’ निर्माण झाला

News Desk

अनिल देशमुखांना आणखी एक धक्का! मुलगा ऋषिकेश देशमुखांना ED चं समन्स 

News Desk

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावी – राजू शेट्टी

News Desk