HW News Marathi
महाराष्ट्र

मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार

पुणे | कोरोनाच्या संकट काळात राज्यात दीड महिना सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबी बंद होत्या. मद्यविक्री देखील बंद होती. महिनाभरापूर्वी राज्य सरकारने मद्यविक्रीस परवानी दिली आणि दुकानासमोर लांब रांगा लागल्या. या महिनाभराच्या मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत ७७५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आणि त्यात एकट्या पुणे जिल्ह्याचा वाटा १०० कोटी रुपयांचा आहे.
प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी परमिट रूम, बियर बार सुरू करण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. परंतु या परमिट रूम आणि बियर बारमध्ये ग्राहकांना अन्न उपलब्ध करून देता येणार नाही किंवा या ठिकाणी बसता येणार नाही, अशी अट देखील घालण्यात आली आहे.
मद्यविक्री सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतकेच नव्हे तर टोकन पद्धतही सुरू केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत अनेक मजूर मूळगावी परतले आहेत. तसेच, सध्या बहुतांश उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या उत्पन्नातही घट झाली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला दर महिन्याला सुमारे २१०० कोटींचा महसूल मिळतो. या तुलनेत मे महिन्यातील महसूल कमी आहे. मे महिन्यात मद्यविक्रीतून ७७६ कोटी आणि लायसन्स शुल्कमधून २१३ कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कविभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाडमध्ये मोठी दुर्घटना, तळई गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू…!

News Desk

प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीने पत्रकातून दिले स्पष्टीकरण

Aprna

कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल होणार

News Desk