HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्याची यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रासारखी !

सातारा | “सातारा माझ्यासाठी गुरूभूमी आहे, साताऱ्याची यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रेसारखेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यातील प्रचार सभेत सांगितले. मोदी सभेत पुढे म्हणाले की, “मी ज्यांच्या संस्कारात वाढलो, मी ज्यांच्याकडून शिक्षा आणि दीक्षा घेतलेली आहे. साताऱ्यातील खटाव गावाचे लक्ष्मणराव इमानदार ज्यांना आम्ही गुजरातमध्ये वकीलसाहेब बोलायचो. त्यांचे जन्मस्थळ हे आहे, त्यांचीही शिक्षा आणि दीक्षा इथेच झाली होती. त्यानंतर ते गुजरातमध्ये आले आणि त्यांनी माझ्यासारख्याला शिष्याला शिक्षा आणि दीक्षा जबाबादारी त्यांनी घेतली. त्यामुळे सातारा माझ्यासाठी गुरूभूमी आहे. साताऱ्याची यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रेसारखेच आहे, असेही साताऱ्यातील सभेत नरेंद्र मोदी म्हणाले.”

“जेव्हा उदयनराजे बोलत होते, तेव्हा माझे मन करत होते ऐकतेच राहू, ऐकतेच राहू, एक एक शब्द हृदयातून निघत होता. सातारा संतांची भूमी आहे. समाज आणि देशाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची भूमी आहे. वीर संभाजी, वीर शाहुजी, समर्थ रामदास स्वामी, रामशास्त्री प्रभुणे, श्रीमंत प्रताप सिंह, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, अशी अतुलनीय व्यक्तिमत्त्वे याच मातीत जन्माला आली आहेत,” असेही मोदींनी सभे संबोधित करताना सांगितले.

साताऱ्यातून निवडणूक लढविण्यास कोणी तयार नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी आज (१७ ऑक्टोबर) प्रचार सभा घेतली. सातारा हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मग सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कोणीही उभे राहण्यासाठी देखील तयार नाहीत. तसेच जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. मोदी म्हणाले की, भाजप सरकार देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवाद जपण्याचा प्राथमिकता देण्यास प्राधान्य देते, असे म्हणत विरोधकांवर तोफ डागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून अण्णांची जनजागृती सुरू

News Desk

जंजिरा किल्ल्यावर 365 दिवस तिरंगा फडकणार ?

News Desk

‘कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल,कटू निर्णय घ्यावे लागतील, मुख्यमंत्र्यांचा भिलवडी वाशियांना दिलासा

News Desk