HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांच्या जवळ

मुंबई | देशात गेल्या २४ तासांमध्ये आढळले करोनाचे ८ हजार १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांता एकूण २०४ रुग्णांचा मृत्यू झाल आहे. देशभरातील एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ९५ हजार ५२६ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत देशभरात एकूण ५ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार ७०६ वर पोहोचली आहे. तर देशात सध्या ९७ हजार ५८१ ॲक्टीव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय आज (२ जून) दिली आहे.

देशात कोरोनामुक्त होणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ होत आहे. यात सरासरी वे ४८.१९ टक्के इतका झाला आहे. कोरोनावर मात झालेल्या रुग्णांचा सरासरी दर १८ मे रोजी ३८.२९ टक्के इतका होता. 3 मे रोजी २६.५९ टक्के एवढा होता आणि १५ एप्रिल रोजी हा दर ११.४२ टक्के एवढा होता. सध्या देशात ९३, ३२२ लोकांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असेलेल्या महाराष्ट्रात जास्त आहे. राज्यात काल (१ जून) ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात एकूण संख्या आता ७० हाजर ०१३ अशी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. मात्र, महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याची संख्येत देखील वाढ होत आहे. राज्यात मार्च महिन्यात कोरोनाच पहिला रुग्ण सापडला होता.

मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

  • मार्च महिन्यात ३०२ पैकी ३९ असे १२.९१ टक्के रुग्ण बरे झाले होते.
  • एप्रिल महिन्यात १०,४९८ पैकी १७७३ असे १६.८८ टक्के रुग्ण बरे झाले.
  • मे महिन्यात ६७,६५५ पैकी २९, ३२९ असे एकूण ४३.३५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
  • राज्यातील मृत्यूदर ३.३७ टक्के आहे.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जूनमध्ये लसींचा पुरवठा सुरळीत होणार, ‘सिरम’ १० कोटी डोस पुरवणार, केंद्राला लिहिले पत्र

News Desk

मुंबईतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद; BMC निर्णय

Aprna

कपिल आणि धीरज वाधवान सीबीआयच्या ताब्यात, अनिल देशमुख यांची ट्वीटद्वारे माहिती

News Desk