HW News Marathi
महाराष्ट्र

“हिंमत असते तर मुंबईतून फिल्मसीटी युपीत नेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचे योगी आदित्यनाथ यांना आव्हान

मुंबई | “हिंमत असेल फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवावी”, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सरकारला दिले आहे. काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या मुद्द्यावर अधुनमधून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतात.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल चित्रपट आणि करमणूक धोरणावरील वेबिनारमध्ये योगी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवा, असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले. तर दुसरीकडे भविष्यात महाराष्ट्र सरकार फिल्मसिटीला आधुनिक सोयी पुरवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीला काही व्यथा, वेदना असतील तर त्या दूर करणं सरकार म्हणून आमचं काम आहे. सरकार बॉलीवूड इंडस्ट्रीला हव्या त्या सोयी पुरवायला तयार आहे. मात्र, यामधून चांगला समाज घडवला गेला पाहिजे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात सगळं काही आहे. दादासाहेब फाळके यांनी ज्या भूमीत चित्रपटसृष्टीचा मुहूर्तमेढ रोवली, त्याठिकाणी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात मोठी फिल्मसीटी तयार करु असे म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता बिचूकलेंना चक्क विधान परिषदेवर जाण्याची इच्छा, राज्यपालांना पाठवले पत्र

News Desk

अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

swarit

HW Exclusive : “शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असून ती आता सुलेमानी सेना झाली”, रवी राणांची टीका

Aprna