HW News Marathi
देश / विदेश

भारताच्या अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार जाहीर

मुंबई | भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी यांना  यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिजती यांच्यासह त्यांची पत्नी एस्थर डफलो यांचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह मायकल क्रेमर यांनाही संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या तीन अर्थशास्त्रज्ञांना वैश्विक गरीबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान बहाल करण्यात येणार आहे.

अभिजीत बॅनर्जी हे सध्या मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आणि त्यांची पत्नी डफलो ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अ‍ॅक्शन लॅब’ चे को-फाउंडर आहेत. बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९८३ मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोलकातामधील माजेरहाट पूल कोसळला

News Desk

CDS जनरल बिपीन रावत अनंतात विलीन

News Desk

EVMHacking : ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित !

News Desk