HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांना माहित नसेल, मी राज्याच्या कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे !

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “कुस्ती पैलवानांशी होते. या ‘अशांशी’ नाही”, असे म्हणत हातवारे करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांवर टीका करताना यावेळी शरद पवार यांनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी आता पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांना माहित नाही कि मी ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चा अध्यक्ष आहे”, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

“मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे आणि मी राज्यातील कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे तरीही मुख्यमंत्री म्हणतात कि त्यांच्या विरोधात पैलवान नाही”, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “राज्यात आमच्या विरोधात कोणी दिसतही नाही. आमच्या विरोधात पैलवानच नाहीत”, असे वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रचारसभांमधून विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यानंतर याच मुद्द्यावरून शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार !

News Desk

ईशान्य मुंबईसाठी सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा

News Desk

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सर्व सरकारी सुविधा

News Desk