HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा

औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला आहे. आज (१० ऑक्टोबर) मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. भाजपचे पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सर्वच नेत्यांच्या सभांचा धडाका आज दिवसभरात पाहायला मिळणार आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी शहा बीडच्या सावरगाव येथील घाटमध्ये आले होते. या दसरा मेळव्यात शहांनी जोरदार भाषण दिले होते. एका अर्थाने हा भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला माजी आमदार आणि सध्या महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह यांच्या प्रचारासाटी तूळजापूरमध्ये आज दुपारी तीन वाजता सभा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या मैदानात उतरलेले शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरेही दोन सभा घेणार आहेत. याशिवाय शहा यांच्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

 

राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


माळशिरस, सोलापूर – उमेदवार राम सातपुते (भाजप- रिपाइं)
फलटण, सातारा – उमेदवार दिगंबर आगवणे (भाजप- रिपाइं)
भोसरी, पुणे येथे रोड शो – उमेदवार महेश लांडगे (भाजप)
पिंपरी चिंचवड – उमेदवार लक्ष्मण जगताप (भाजप)

भाजपाध्यक्ष अमित शाह

जत, सांगली – उमेदवार विलासराव जगताप (भाजप)
अक्कलकोट, सोलापूर – उमेदवार सचिन शेट्टी (भाजप) (भाजपच्या दारातून परतलेले काँग्रेस उमेदवार सिद्धराम म्हेत्रेंविरोधात)
तुळजापूर, उस्मानाबाद – उमेदवार राणा जगजितसिंह पाटील (भाजप) (राष्ट्रवादीतून आयात)

उद्धव ठाकरे

घनसावंगी, जालना – उमेदवार हिकमत उढाण (शिवसेना)
वैजापूर, औरंगाबाद
कन्नड, औरंगाबाद
औरंगाबाद शहर

आदित्य ठाकरे

शहापूर, ठाणे – उमेदवार पांडुरंग बरोरा (शिवसेना) (राष्ट्रवादीतून आयात)
इगतपुरी, नाशिक – उमेदवार निर्मला गावित (शिवसेना) (काँग्रेसमधून आयात

राज ठाकरे

सांताक्रुझ, मुंबई
गोरेगाव, मुंबई

शरद पवार

बुट्टीबोरी, नागपूर
काटोल, नागपूर – उमेदवार अनिल देशमुख (राष्ट्रवादी)

योगी आदित्यनाथ

कुलाबा, मुंबई – उमेदवार राहुल नार्वेकर (भाजप)
कांदिवली, मुंबई – उमेदवार अतुल भातखळकर (भाजप)
जिंतूर, परभणी – उमेदवार मेघना बोर्डीकर (भाजप)
रावेर, जळगाव – उमेदवार हरिभाऊ जावळे (भाजप)

 

 

 

 

 

 

 

 

Related posts

नावेत बसून सेल्फी काढणे बेतले जीवावर

News Desk

एसटी कर्मचा-यांना सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार?

News Desk

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ १० हजार कोटीची मदत

News Desk