रत्नागिरी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची काल भेट घेऊन वाढीव वीज बिलासंदर्भात बातचीत केली. त्यानंतर राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला होता. यावरुन विरोधक टीका करत आहेत. या टीकेला शिवसेनेने उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असेही सत्तार यावेळी म्हणाले आहेत.
राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भेटीवर मार्मिक भाष्य करत शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरेंना डिवचलं. “शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी शरद पवारांशी फोन करत चर्चा केली आहे. आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.