जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर अनेक भाजपमधील कार्यकर्त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर भाजपने जिल्ह्यात पक्षांतर थांबण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व तालुक्यात बैठका संपन्न झाल्या आहेत. या सर्व बैठका माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहेत.
भुसावळ, यावल, मुक्ताईनगर येथे काल बैठका पार पडल्या. मात्र या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीमध्ये मात्र गिरीश महाजन यांनी दांडी मारली. भुसावळ येथील बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष, मुक्ताईनगर येथील नगराध्यक्ष यांनी आपली अनुपस्थिती दाखवली .यावरून जरी कार्यकर्ते भाजप पक्षात असले, तरी मनाने ते खडसेंच्या बाजूने असल्याचे दाखवून देत आहेत. या बैठकींना रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावली, पण कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे.
खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर भाजपला डॅमेज होऊ नये म्हणून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्हाभर तसेच तालुकास्तरावर बैठक घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, नगराध्यक्ष पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली. मात्र खडसे यांच्या बालेकिल्ला असलेला रावेर लोकसभा मतदारसंघात याचा उलट परिणाम दिसून आला. आमदार, खासदार तसेच नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली दिसून आले. त्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांची अनुपस्थिती होती.
मुक्ताईनगर, यावल, भुसावळ या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये आमदार गिरीश महाजन हे अनुपस्थित होते. मुक्ताईनगर येथील भाजपचे प्रदेश संघटक विजय पुराणिक, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, रक्षा खडसे, अशोक कांडेलकर, डॉक्टर राजेंद्र फडके, किशोर काळकर, नंदू महाजन यांची उपस्थिती होती.
मुक्ताईनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नजमा तडवी यांच्यासह नऊ नगरसेवकांनी या बैठकीला पाठ फिरवली तर भुसावळ येथील बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे भाजपा सरचिटणीस प्राध्यापक सुनील नेवे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील गिरीश महाजन बापू महाजन नगरसेवक बोधराज चौधरी भाजपा गटनेते मुन्ना तेली पंचायत समिती उपसभापती व इतर सदस्य यांची यावेळी अनुपस्थिती दिसून आली. यावर बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे म्हणाले की यांचे राजीनामे आलेले नाही मात्र त्यांच्या अनुपस्थितीत बद्दल खुलासा जरूर करतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.